graph, diagram, recession-3078539.jpg

पडत्या मार्केट मध्ये काय कराव ?

मार्केट पडत आहे आता काय करावेहा प्रश्न तुमच्याही मनामध्ये कदाचित आला असेल. सध्याची परिस्थिती बघता मार्केट दिवसेंदिवस खाली खाली जात आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कदाचित भीती वाटत असेल, कदाचित काही लोकांना ही एक संधी वाटत असेल. नेमकं काय करावं हे या लेखामधून मी तुम्हाला सांगणार आहे 

सर्वप्रथम लक्षात घ्या मार्केट खाली का येते?

मार्केट पडते कारण मार्केट नेहमी वर जात नसते. जरी तेजी असेल तरी करेक्शन्स किंवा नफावसुली ही होतच असते.  ज्यांनी खालच्या किमतीला Entry केली होती ते लोक कुठे ना कुठे तरी प्रॉफिट बुक करणारच आहेत. 2020 मध्ये मार्केट crash झाले होते तेव्हा ते 7500 एवढ्या लेवल पर्यंत गेले होते (Nifty50 Index) तिथून जी वाढ व्हायला सुरुवात झाली ती 18600 पर्यंत होतच राहिली म्हणजेच मार्केट जवळजवळ 7500 पासून दीड पट वाढले आहे आणि याचे करेक्शन आता सुरू आहे.

तसे बघाल तर मार्केट खाली जात आहे हे आमच्यासाठी काही सरप्राईज नाही ; कारण ते खाली जाणार आहे याचे अनॅलिसिस आम्ही 16 डिसेंबर 2021 रोजी केले होते आणि त्यावर ती एक स्पेशल लाईव्ह सेशन देखील घेतला होता

खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही तो बघू शकता

https://youtu.be/D-Ac_yJM40A

मार्केटच्या लेव्हल्स काय असणार आहेत किती पर्यंत खाली जाऊ शकते तसेच खाली गेले तरी प्रॉफिट कसे करू शकतो हे सगळे यात सांगितले आहे

मग प्रश्न उरतो की आता आपण काय केले पाहिजे?

१. सर्वप्रथम आपण मार्केटमध्ये केवळ शेअर्स स्वस्त झाले म्हणून खरेदी करायचा प्रयत्न टाळलं पाहिजे कारण का मार्केट जोपर्यंत वर जात नाहीत   तोपर्यंत आपल्याला चांगले रिटर्न्स मिळू शकत नाही 

२. आपण SIP सुरू केली पाहिजे म्युचल फंड मध्ये सिप आपल्याला लॉंग टर्म मध्ये खूप चांगला परतावा मिळवून देते आणि रिस्क देखील डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट पेक्षा कमी असते

३. स्टडी वर फोकस केला पाहिजे. मार्केट कायमस्वरूपी खाली जात राहणार नाहीये  कधीतरी ते वर येणारच आहे परंतु आपल्याकडे चांगले स्किल्स असतील तरच आपण प्रॉफिट काढू शकतो आणि हे स्किल सध्या तुम्ही वेळ आहे म्हणून शिकू शकता. (तुम्हाला आमच्याकडून शिकायचे असेल तर आमची कम्यूनिटी जॉइन करा)

४. महत्त्वाची गोष्ट आपण केली पाहिजे ती आहे  सेविंग सुरू केली पाहिजे किंवा सुरू केली असेल तर वाढवली पाहिजे म्हणजे जेव्हा मार्केट वर जायला सुरू करेल तेव्हा आपल्याकडे पुरेसे funds असतील आणि चांगले प्रॉफिट मिळवू शकू.