पुस्तकांमध्ये एक जादू असते, एक ताकद असते आपलं आयुष्य बदलण्याची, एक पुस्तक देखील पूर्ण आयुष्याला कलाटणी देऊ शकते.
मलादेखील लहानपणापासून पुस्तके वाचण्याची आवड होती सुरुवातीला गोष्टीची पुस्तके नंतर कादंबऱ्या त्यानंतर सेल्फ हेल्प असा माझा वाचनाचा प्रवास.
ज्या वेळेला मी ट्रेडिंगला सुरुवात केली त्यावेळेला मी फक्त टेक्निकल ऍनालिसिसची पुस्तके वाचत असे.
नंतर समजले की सिस्टिम सारखी बदलणार नाहीये , फक्त एन्ट्री आणि एक्झिट वर फोकस करून चालणार नाही महत्वाचे आहे की माईंडसेट कसा योग्य राहील याची काळजी घेणे.
सर्वप्रथम एक पुस्तक माझ्या वाचनात आले त्याचे नाव होते रिच डॅड पुवर डॅड आणि त्यामुळे माझी श्रीमंती कडे बघण्याची पूर्ण दृष्टी बदलली.
त्यानंतर वाचनात आले माझे सर्वात आवडते पुस्तक सिक्रेट्स ऑफ द मिलेनियम माईंड आणि यामुळे मी माझ्या आयुष्यामध्ये खाडकन जागा झालो ज्या आज्ञातामध्ये मी आयुष्य जगत होतो, ज्याला मी समजत होतो हेच खरे सुख आहे ते सर्व भ्रम या पुस्तकामुळे मोडून पडले समृद्धीच्या वाटेवर मी चालू लागलो.
आणि तिसरे पुस्तक म्हणजे या सर्व बदललेल्या मतांवर काम कसे करावे त्यावरचं एक सोलुशन! त्याचं नाव रीचेस्ट मॅन इन बॅबिलोन . पैसा वाचवून श्रीमंत कसं होऊ शकतो आणि तो कसा वाढवावा हे या पुस्तकामध्ये खूप छान गोष्टीरूपाने सांगितले आहे.
माझे असे ठाम मत आहे की जर तुम्ही ही तीन पुस्तके वाचली तुमची आर्थिक परिस्थिती निश्चितच बदलू शकतो हा माझा वैयक्तिक अनुभव आहे.
मी प्रत्येक ट्रेडरला सांगेन की तुम्ही हे तीन पुस्तकं वाचाच.
मी खाली तिन्ही पुस्तकांच्या लिंक देत आहे
रीचेस्ट मॅन इन बॅबिलोन : https://amzn.to/3k0TSXE